Skip to main content

Posts

Showing posts from May, 2026

'रिसर्च कॉम्पेन्डिअम' या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते 'रिसर्च कॉम्पेन्डिअम' या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.  या संग्रहात महाविद्यालयातील संशोधक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २०२५ या वर्षांत विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन लेखांचे ( Research Paper) संकलन या मध्ये केले आहे. महाविद्यालयातील आयक्यूएसी विभागाने हे संकलन केले आहे. या संकलनाचे कार्य डॉ. सुनिता दानाई यांनी केले आहे. या संकलित आवृत्तीमुळे संशोधकांना एकाच पुस्तकात सर्व लेख वाचायला मिळणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.  याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम. जी. ताकवले, संस्थेचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव आत्माराम जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश घुले, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. लतेश निकम, डॉ. राहुल नरंगळकर, डॉ. सुजाता टापरे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ, दत्तात्रय बेसके, वैशाली कोरडे, विद्या खराडे आदी उपस्थित होते.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ओम जगतापचे राष्ट्रीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत यश

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ओम जगतापचे राष्ट्रीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत यश पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील ओम जगताप या विद्यार्थ्याने भारतीय मानक ब्युरो (BIS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन रीअर व्हीव मिरर आणि वैक्यूम फ्लास्क अलोंग विथ द स्टॅंडर्ड वॉच २९ व ३० एपिसोड' या विषयावर आधारित झालेल्या ऑनलाइन क्विझ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याला सात हजार पाचशे रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. उपप्राचार्य गजाला सय्यद बीआयएस मेंटोंर प्रीती राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले आहे.  या यशाबद्दल ओम जगताप याचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापकांनी अभिनंदन केले.

महाविद्यालयात ऑनलाइन कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) प्रशिक्षण

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, अप एज्युकेटर्स व गूगल फॉर एज्युकेशन बेंगलोर, गूगल जेमिनी सर्टिफिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षण संस्थांतील अध्यापकांसाठी ऑनलाइन कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेत उच्च शिक्षणातील एआयचा परिचय, प्रभावी एआय प्रॉम्प्टिंगसाठी पार्ट्स फ्रेमवर्क, एआयचा नैतिक आणि सुरक्षित वापर, सखोल संशोधन आणि अंतर्दृष्टीसाठी एआय अभ्यासक्रम, संरेखित एआय संसाधने तयार करणे, सिम्युलेशन, सॉफ्टवेअर प्रोटोटाइप आणि सानुकूलित एआय बॉट्स तयार करणे या विषयी आरथे कुमारन यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणात ऑनलाइन शिक्षणाचा समावेश करण्यात आला असून ऑनलाइन शिक्षणात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे सहाय्य घेतल्यास ते अधिक प्रभावी करता येईल. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत १४५ प्...

महाविद्यालयाचा बरावीचा निकाल ९५.५०%

 अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा बरावीचा निकाल निकाल ९५.५०% महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२६ चा निकाल जाहीर झालेला आहे.  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या एच.एस.सी. व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या सहा अभ्यासक्रमा चा निकाल १००%, बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.३९%, कला शाखेचा निकाल ९४.८२% व वाणिज्य शाखेचा निकाल ८२.४२% इतका लागला असून एकूण शेकडा निकाल ९५.५०% इतका लागलेला आहे. महाविद्यालयाने जर वर्षी प्रमाणे या वर्षी ही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. शाखांनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: विज्ञान शाखा प्रथम क्रमांक आर्या अजय कदम (९०.१७%) ,  द्वितीय क्रमांक हर्षवर्धन आनंद थोरात (८१.१७%)   तृतीय क्रमांक प्रणित प्रमोद जाधव (८०.००%)  कला शाखा प्रथम क्रमांक वैष्णवी राजेंद्र पंढरपुरे (८६.५०%),  द्वितीय क्रमांक चेतन बळीराम गोरे (८६.१७%)  तृतीय क्रमांक वैशाली लक्ष्मीनारायण वर्मा (८५.००%)   वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक सावित्री ना...

महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

  अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वसतिगृहाचे गृहपाल अर्चना पवार व श्रीकांत माने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या स्वागत हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे महाराष्ट्र दिन व कामगार दिना बद्दल माहिती देऊन सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गृहपाल अर्चना पवार यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले. आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तसेच १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अकरावी परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शाखा प्रथम क्रमांक  कांबळे अंजली बसवराज ७६.३३% द्वितीय क्रमांक  कदम नम्रता संतोष ७०.८३% वाणिज्य शाख...