Skip to main content

महाविद्यालयात ऑनलाइन कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) प्रशिक्षण

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, अप एज्युकेटर्स व गूगल फॉर एज्युकेशन बेंगलोर, गूगल जेमिनी सर्टिफिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षण संस्थांतील अध्यापकांसाठी ऑनलाइन कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.

या कार्यशाळेत उच्च शिक्षणातील एआयचा परिचय, प्रभावी एआय प्रॉम्प्टिंगसाठी पार्ट्स फ्रेमवर्क, एआयचा नैतिक आणि सुरक्षित वापर, सखोल संशोधन आणि अंतर्दृष्टीसाठी एआय अभ्यासक्रम, संरेखित एआय संसाधने तयार करणे, सिम्युलेशन, सॉफ्टवेअर प्रोटोटाइप आणि सानुकूलित एआय बॉट्स तयार करणे या विषयी आरथे कुमारन यांनी मार्गदर्शन केले.

नवीन शैक्षणिक धोरणात ऑनलाइन शिक्षणाचा समावेश करण्यात आला असून ऑनलाइन शिक्षणात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे सहाय्य घेतल्यास ते अधिक प्रभावी करता येईल. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेत १४५ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. लतेश निकम यांनी केले तर डॉ. प्रशांत मुळे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी मोरे हिचे राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील कु. श्रावणी संजय मोरे या विद्यार्थिनीला भारतीय मानक ब्युरो (BIS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन, प्लायवूड  आणि इलेक्ट्रॉनिक्स अलोंग विथ द स्टॅंडर्ड वॉच २६ व २७ एपिसोड' या विषयावर आधारित झालेल्या ऑनलाइन क्विझ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तिला सात हजार पाचशे रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.  बीआयएस मेंटोंर प्रीती राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले आहे.  या यशाबद्दल श्रावणी मोरे हिचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य गजाला सय्यद तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापकांनी अभिनंदन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम या उपक्रमाचे १३ ते १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, कायदा, आणि धर्म यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. ते आठरा तास अभ्यास करायचे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती आणि व्यासंगाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे सांगितले. यावेळी जितीन गावित, दिशा नगरे, सुप्रिया पोळ, सृष्टी मोरे, विद्या रांजणे, देविका देडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. अनिल देवकाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ...

अण्णासाहेब मगर महाविद्यालय किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धेत प्रथम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि ग्रीन वसुंधरा फाउंडेशन यांच्या ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धा २०२५-२६' मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हे पारितोषिक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, ग्रीन कॅम्पस समिती समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे,  प्रा. हेमलता सोनवणे प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. उर्मिला धनगर यांनी स्वीकारले. समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले,  केपीसीएल ओएचसी प्रमुख डॉ. सुरेश मिजार, केपीसीएल सहयोगी उपाध्यक्ष एचआर गणेश चौधरी, केपीसीएल सीएसआर प्रमुख उमा नांदेडकर, ग्रीन वसुंधरा फाउंडेशन संचालक वीरेंद्र चित्रव, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. 'ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज' हा केवळ एक पर्यावरणीय उपक्रम नाही तर तो वेगाने मानसिकता बदलणारी चळवळ बनत आहे. पर्यावरणपूरक स्मार्ट कॅम्पसचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवणे हा यामागील उद्देश...