अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध व्यापक जनजागृती पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत “सामुदायिक सहभागीता प्रकल्प (Community Engagement Program) ” द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे राबविला. या प्रकल्पाच्या माध्यमातून “प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि प्रदूषण” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणण्याची गरज नागरिकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रकल्पांतर्गत प्रभात फेरी, पोस्टर प्रदर्शन आणि पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीचा मार्ग अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर ते मुलींचे वसतिगृह, अण्णासाहेब मगर महाविद्यालय असा ठेवण्यात आला होता. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक, घोषवाक्ये आणि जनजागृतीपर संदेश घेऊन परिसरातील नागरिकांना प्लास्टिकच्या दुष्प...