Skip to main content

'वंदे मातरम' गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा संपन्न


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'वंदे मातरम' गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य राहूल पाखरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे
होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक व राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले.

या स्पर्धेंचे बक्षीस वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. गणेश भामे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

*स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे*
*काव्यवाचन स्पर्धा*
प्रथम क्रमांक : अश्विनी झरेकर न्यू आर्ट्स कॉलेज अहिल्यानगर (बक्षीस : अकरा हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक : हर्षदा गरूड मराठवाडा मित्रमंडळ कॉमर्स कॉलेज पुणे, (बक्षीस : नऊ हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक : आशुतोष वसुमते यशवंतराव चव्हाण विधी कॉलेज पुणे (बक्षीस : सात हजार रुपये रोख) उत्तेजनार्थ : गोविंद भांड बीजेएस कॉलेज पुणे व देवीदास घुले एसएसबी कॉलेज एज्युकेशन श्रीरामपूर (बक्षीस : प्रत्येकी पाच हजार रुपये रोख)

*निबंध स्पर्धा*
प्रथम क्रमांक : श्रुती शिंदे के. के. वाघ कॉलेज नाशिक (बक्षीस : अकरा हजार रुपये रोख)
द्वितीय क्रमांक : राजेश्वरी रेड्डी यशवंतराव चव्हाण विधी कॉलेज पुणे (बक्षीस : नऊ हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक : धनश्री सोनवणे अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर (बक्षीस : सात हजार रुपये रोख) उत्तेजनार्थ : ऋषिकेश टेकाळे एन. बी. एन सिंहगड कॉलेज पुणे व कावेरी दादासाहेब कोते एस.एस बी. कोलेज ऑफ एज्युकशन श्रीरामपूर (बक्षीस : प्रत्येकी पाच हजार रुपये रोख)

*भित्तीचित्र स्पर्धा*
प्रथम क्रमांक : समृध्दी कौटे संगमनेर कॉलेज, संगमनेर (बक्षीस : अकरा हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक : श्रेया घनसावंत के एस के डब्ल्यू कॉलेज नाशिक (बक्षीस : नऊ हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक : लतिका घुले टी जे कॉलेज खडकी (बक्षीस : सात हजार रुपये रोख) उत्तेजनार्थ : वैष्णवी पवार यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे व करिष्मा मधे अगस्ती कॉलेज, अकोले (बक्षीस : प्रत्येकी पाच हजार रुपये रोख)

*वक्तृत्व स्पर्धा*
प्रथम क्रमांक : साहिल दातार एचपीटी आर्ट्स, केवायके सायन्स कॉलेज नाशिक (बक्षीस : अकरा हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक : चैतन्य गर्जे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे (बक्षीस : नऊ हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक : गोविंद भांड बी.जे.एस. कॉलेज वाघोली पुणे (बक्षीस : सात हजार रुपये रोख) उत्तेजनार्थ : सार्थक गायकर ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर व श्रेया आवळे पीव्हीजी कॉलेज पुणे (बक्षीस : प्रत्येकी पाच हजार रुपये रोख)

काव्य वाचन स्पर्धेचे डॉ. अतुल चौरे व डॉ.नाना झगडे, निबंध स्पर्धेचे प्रा. शशिकला वाल्मिकी, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. वंदना सोनवले, भित्तीचित्र स्पर्धेचे निरज सबनीस, प्रियांका सावंत, प्रसाद आव्हाड, वक्तृत्व स्पर्धेचे प्रवीण शिंदे, यशवंत खाडे, प्रा. स्वामीराज भिसे यांनी परीक्षण केले.
या स्पर्धांसाठी पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार डॉ. सविता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना श्रीचिप्पा, डॉ. वंदना सोनवले, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. अपूर्वा बनकर यांनी संयोजन केले.

Comments

Popular posts from this blog

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी मोरे हिचे राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील कु. श्रावणी संजय मोरे या विद्यार्थिनीला भारतीय मानक ब्युरो (BIS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन, प्लायवूड  आणि इलेक्ट्रॉनिक्स अलोंग विथ द स्टॅंडर्ड वॉच २६ व २७ एपिसोड' या विषयावर आधारित झालेल्या ऑनलाइन क्विझ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तिला सात हजार पाचशे रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.  बीआयएस मेंटोंर प्रीती राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले आहे.  या यशाबद्दल श्रावणी मोरे हिचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य गजाला सय्यद तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापकांनी अभिनंदन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम या उपक्रमाचे १३ ते १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, कायदा, आणि धर्म यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. ते आठरा तास अभ्यास करायचे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती आणि व्यासंगाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे सांगितले. यावेळी जितीन गावित, दिशा नगरे, सुप्रिया पोळ, सृष्टी मोरे, विद्या रांजणे, देविका देडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. अनिल देवकाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ...

अण्णासाहेब मगर महाविद्यालय किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धेत प्रथम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि ग्रीन वसुंधरा फाउंडेशन यांच्या ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धा २०२५-२६' मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हे पारितोषिक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, ग्रीन कॅम्पस समिती समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे,  प्रा. हेमलता सोनवणे प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. उर्मिला धनगर यांनी स्वीकारले. समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले,  केपीसीएल ओएचसी प्रमुख डॉ. सुरेश मिजार, केपीसीएल सहयोगी उपाध्यक्ष एचआर गणेश चौधरी, केपीसीएल सीएसआर प्रमुख उमा नांदेडकर, ग्रीन वसुंधरा फाउंडेशन संचालक वीरेंद्र चित्रव, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. 'ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज' हा केवळ एक पर्यावरणीय उपक्रम नाही तर तो वेगाने मानसिकता बदलणारी चळवळ बनत आहे. पर्यावरणपूरक स्मार्ट कॅम्पसचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवणे हा यामागील उद्देश...