पुणे जिल्हा शिक्षण मंडळच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला 'क्विक हील फाउंडेशन'चे राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार सायबर साक्षरतेच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या 'क्विक हील फाउंडेशन'च्या (Quick Heal Foundation) वतीने आयोजित 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' या उपक्रमात हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्र सायबर पोलीस दलाचे डीआयजी (DIG) संजय शिंत्रे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. 'क्विक हील'चे संस्थापक डॉ. कैलास काटकर (Chairman & MD), डॉ. संजय काटकर (Joint MD) आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोहिमेत महाविद्यालयाला राज्यस्तरावर 'न्यू क्लब रनर-अप' (New Club Runner-up) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सर यांना त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल 'सर्वोत्कृष्ट प्राचार्य रनर-अप' (Best Principal Runner-up) हा विशेष बहुमान मिळाला. या यशस्वी मोहिमेच्या अंमलबजावणीत उपप्राचार्य डॉ. मुळे ...