नोकरी मिळवण्यापेक्षा उद्योजक बनणे सोपे : डॉ. राजेंद्र हिरेमठ
उद्योजक होण्यासाठी आपल्याकडे अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्यापेक्षा उद्योजक बनणे सोपे आहे. त्यामुळे तरुणांनी नवीन कल्पना घेऊन द्योजकतेकडे वळले पाहिजे, उद्योग व्यवसाय करताना मनुष्यबळ, यंत्रसामग्री, वित्त, विपणन महत्त्वाचे आहे. उद्योगासाठी वित्तीय नियोजन महत्त्वाचे असते. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा अनेक योजना आपल्याकडे आहेत. जर उद्योगाचा आराखडा तयार असेल तर पैशांमुळे कुठेही अडणार नाही. उद्योजकांना बळ देण्यासाठी अनेक सरकारी संस्था देखील आहेत. असे मत, सीनर्जी इन्फ्रासिस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने एसपीपीयू स्टार्टअप व्याख्यान मालेत सीनर्जी इन्फ्रासिस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, भाऊ इंस्टिट्यूट व जनसेवा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उद्योजक तयार झाले तर नोकरी मागणाऱ्या पेक्षा नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढेल. आणि त्यातून प्लेसमेंट सेलचे काम सोपे होईल अशी आशा व्यक्त केली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, समन्वयक प्रा. अनुराधा कांबळे, प्रा. वैशाली शेरकर, प्रा. रेश्मा शेख ऋषिकेश कुंभार, ऋषिकेश मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आशा माने यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.

Comments
Post a Comment