पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशन लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सीओ-पीओ मूल्यांकन आणि अहवाल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए. एम. जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशन लिमिटेड मुंबई संचालक योगेश पवार व समृद्धी गाजरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रस्ताविक केले. परिणामाधिष्ठित शिक्षण पद्धती (OBE ) म्हणजे विद्यार्थ्यांनी अपेक्षित शिक्षण परिणाम (Learning Outcomes) कितपत साध्य केले आहेत, हे मोजून आणि त्यामध्ये सातत्याने सुधारणा करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविणारी प्रणाली आहे. अभ्यासक्रमात निश्चित केलेली उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात का? याचे मूल्यमापन ही प्रणाली करते. परिणाम-आधारित शिक्षण हे एक निरंतर शैक्षणिक गुणवत्ता चक्र आहे, जे मूल्यमापन डेटाचे कृतीयोग्य शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेत करते. ...
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गावामधील विविध घटकांचे सर्वेक्षण, विश्लेषण करून त्याचा अहवाल पुस्तक रूपाने तयार केला जातो. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात मु. पो. सुकलवाडी ता. पुरंदर या ठिका णी असणा-या माती, पाणी, वनस्पती, आर्थिक, सामाजिक, राजकीय माहितीचे पुस्तक तयार करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अर्चना श्रीचिप्पा, प्रा. ऋषिकेश मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. सविता कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 5 गावांमध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण करून त्याची माहिती पुस्तक रूपाने तयार करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी या पुस्...