Skip to main content

महाविद्यालयात ‘सीओ-पीओ मूल्यांकन आणि अहवाल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशन लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सीओ-पीओ मूल्यांकन आणि अहवाल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए. एम. जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशन लिमिटेड मुंबई संचालक योगेश पवार व समृद्धी गाजरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रस्ताविक केले.

परिणामाधिष्ठित शिक्षण पद्धती 

(OBE ) म्हणजे विद्यार्थ्यांनी अपेक्षित शिक्षण परिणाम (Learning Outcomes) कितपत साध्य केले आहेत, हे मोजून आणि त्यामध्ये सातत्याने सुधारणा करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविणारी प्रणाली आहे. अभ्यासक्रमात निश्चित केलेली उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात का? याचे मूल्यमापन ही प्रणाली करते. परिणाम-आधारित शिक्षण हे एक निरंतर शैक्षणिक गुणवत्ता चक्र आहे, जे मूल्यमापन डेटाचे कृतीयोग्य शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेत करते. असे डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशन लिमिटेड मुंबई संचालक योगेश पवार यांनी सांगितले.

डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ज्ञानाबरोबर क्षमतांचा विकास व नवीन कल्पना, कौशल्ये आत्मसात  करता यावीत  या अनुषंगाने ‘सीओ-पीओचे उपयोजन केले पाहिजे. असे सांगितले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए. एम. जाधव यांनी सीओ - पीओ  हे विद्यार्थी, शिक्षक, अध्यापन आणि अभ्यासक्रम या संबंधी असून या मूल्यमापनाने शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांचे बौद्धिक स्तर लक्षात घेऊन अध्यापन करता येऊ शकते. असे सांगितले.

प्रा. शशिकला वाल्मिकी, डॉ. बजरंग शिंदे, डॉ. उल्हास लंगोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या प्रसंगी डॉ. प्रशांत मुळे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. लतेश निकम, डॉ. विलास मोरे उपस्थित होते. या कार्यशाळेत अण्णासाहेब मगर महाविद्यालय, वाघिरे महाविद्यालय  सासवड, इंजिनिअरिंग कॉलेज हडपसर, लॉ कॉलेज हडपसर फार्मसी कॉलेज आणि एमबीए कॉलेज या महाविद्यालयातील एकूण  २७५ शिक्षक सहभागी झाले होते.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास मोरे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले. परिचय डॉ. लतेश निकम यांनी करून दिला.

Comments

Popular posts from this blog

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी मोरे हिचे राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील कु. श्रावणी संजय मोरे या विद्यार्थिनीला भारतीय मानक ब्युरो (BIS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन, प्लायवूड  आणि इलेक्ट्रॉनिक्स अलोंग विथ द स्टॅंडर्ड वॉच २६ व २७ एपिसोड' या विषयावर आधारित झालेल्या ऑनलाइन क्विझ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तिला सात हजार पाचशे रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.  बीआयएस मेंटोंर प्रीती राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले आहे.  या यशाबद्दल श्रावणी मोरे हिचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य गजाला सय्यद तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापकांनी अभिनंदन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम या उपक्रमाचे १३ ते १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, कायदा, आणि धर्म यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. ते आठरा तास अभ्यास करायचे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती आणि व्यासंगाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे सांगितले. यावेळी जितीन गावित, दिशा नगरे, सुप्रिया पोळ, सृष्टी मोरे, विद्या रांजणे, देविका देडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. अनिल देवकाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ...

अण्णासाहेब मगर महाविद्यालय किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धेत प्रथम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि ग्रीन वसुंधरा फाउंडेशन यांच्या ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धा २०२५-२६' मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हे पारितोषिक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, ग्रीन कॅम्पस समिती समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे,  प्रा. हेमलता सोनवणे प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. उर्मिला धनगर यांनी स्वीकारले. समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले,  केपीसीएल ओएचसी प्रमुख डॉ. सुरेश मिजार, केपीसीएल सहयोगी उपाध्यक्ष एचआर गणेश चौधरी, केपीसीएल सीएसआर प्रमुख उमा नांदेडकर, ग्रीन वसुंधरा फाउंडेशन संचालक वीरेंद्र चित्रव, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. 'ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज' हा केवळ एक पर्यावरणीय उपक्रम नाही तर तो वेगाने मानसिकता बदलणारी चळवळ बनत आहे. पर्यावरणपूरक स्मार्ट कॅम्पसचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवणे हा यामागील उद्देश...