अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वसतिगृहाचे गृहपाल अर्चना पवार व श्रीकांत माने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या स्वागत हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे महाराष्ट्र दिन व कामगार दिना बद्दल माहिती देऊन सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गृहपाल अर्चना पवार यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले. आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तसेच १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अकरावी परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कला शाखा
प्रथम क्रमांक कांबळे अंजली बसवराज ७६.३३%
द्वितीय क्रमांक
कदम नम्रता संतोष ७०.८३%
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक भंडाळकर श्रावणी गणेश ७८.३३%
द्वितीय क्रमांक औटी प्रतीक्षा गणेश ७५.३३%
विज्ञान शाखा
मोरे श्रावणी संजय ८३.६७%
द्वितीय क्रमांक शेरकर विष्णुदास बाबासाहेब ८२.००%
व्यावसाय अभ्यासक्रम विभाग
ऑटोमोबाईल तंत्रज्ञान
प्रथम क्रमांक सय्यद रहान आझम ७४%
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान
प्रथम क्रमांक पंडित ओंकार दत्तारय ६५%
विद्युत तंत्रज्ञान
प्रथम क्रमांक बधे गौरव योगेश ८६%
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
प्रथम क्रमांक बोडके राजनंदिनी श्रीधर ७२%
लेखांकन आणि कार्यालय व्यवस्थापन
प्रथम क्रमांक देशमुख सिद्धी सुहास ७७%
बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा
प्रथम क्रमांक काळे क्रांती सिद्रम ७५%
या प्रसंगी या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. गजाला सय्यद , प्रा. ऋषिकेश कुंभार, दत्तात्रय बेसके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ऋषिकेश कुंभार यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.




Comments
Post a Comment