Skip to main content

जागतिक महिला दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

 


जागतिक महिला दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या आरोग्य विभाग, लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (ससाणे नगर) आणि गॅलॅक्सी पॅथॉलॉजी सेंटर (हडपसर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची मोफत हिमोग्लोबिन तसेच कम्प्लीट ब्लड काउंट (CBC) तपासणी करण्यात आली. एकूण १७८ विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७ टक्के विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले, ही चिंताजनक बाब असून संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना याबाबत माहिती देऊन लवकरच विद्यार्थिनी व पालकांसाठी मुलींच्या आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले .

तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल पानसरे आणि जनरल फिजिशियन डॉ. प्रसाद जोगदंड यांनी उपस्थित विद्यार्थिनींना वैद्यकीय सल्ला देत हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक आहार, औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी विद्यार्थिनींना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. या शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. शरद गिरमकर यांनी काम पाहिले, तर उद्घाटन कार्यक्रमाचे आभार डॉ. महेश जोशी यांनी मानले.

शिबिरातील तपासणीसाठी लाईफ केअर हॉस्पिटल व गॅलॅक्सी पॅथॉलॉजी सेंटरचे पॅथॉलॉजी तंत्रज्ञ डॉ. सचिन निघणे, श्री. उज्वल अहिरे तसेच श्रीमती सुहाना, श्रीमती नूतन, श्रीमती अपेक्षा व श्रीमती प्रतीक्षा यांनी सहकार्य केले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागातील डॉ. शशिकला वाल्मिकी, सौ. कल्पना गिरमकर, प्रा. शिल्पा गायकवाड, सौ. आरती पवार, सौ. कल्याणी भामरे, सौ. विजयश्री सिद्धेश्वर, प्रा. निकिता मदने, सौ. जयश्री अवचर, डॉ. सुनिता खेडेकर, सौ. रेखा शिंदे, श्री. नारायण खोमणे तसेच इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी मोरे हिचे राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील कु. श्रावणी संजय मोरे या विद्यार्थिनीला भारतीय मानक ब्युरो (BIS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन, प्लायवूड  आणि इलेक्ट्रॉनिक्स अलोंग विथ द स्टॅंडर्ड वॉच २६ व २७ एपिसोड' या विषयावर आधारित झालेल्या ऑनलाइन क्विझ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तिला सात हजार पाचशे रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.  बीआयएस मेंटोंर प्रीती राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले आहे.  या यशाबद्दल श्रावणी मोरे हिचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य गजाला सय्यद तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापकांनी अभिनंदन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम या उपक्रमाचे १३ ते १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, कायदा, आणि धर्म यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. ते आठरा तास अभ्यास करायचे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती आणि व्यासंगाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे सांगितले. यावेळी जितीन गावित, दिशा नगरे, सुप्रिया पोळ, सृष्टी मोरे, विद्या रांजणे, देविका देडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. अनिल देवकाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ...

अण्णासाहेब मगर महाविद्यालय किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धेत प्रथम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि ग्रीन वसुंधरा फाउंडेशन यांच्या ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज स्पर्धा २०२५-२६' मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हे पारितोषिक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, ग्रीन कॅम्पस समिती समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे,  प्रा. हेमलता सोनवणे प्रा. मेघमाला वाघमोडे, प्रा. उर्मिला धनगर यांनी स्वीकारले. समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले,  केपीसीएल ओएचसी प्रमुख डॉ. सुरेश मिजार, केपीसीएल सहयोगी उपाध्यक्ष एचआर गणेश चौधरी, केपीसीएल सीएसआर प्रमुख उमा नांदेडकर, ग्रीन वसुंधरा फाउंडेशन संचालक वीरेंद्र चित्रव, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. 'ग्रीन कॉलेज स्मार्ट कॉलेज' हा केवळ एक पर्यावरणीय उपक्रम नाही तर तो वेगाने मानसिकता बदलणारी चळवळ बनत आहे. पर्यावरणपूरक स्मार्ट कॅम्पसचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवणे हा यामागील उद्देश...