पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, एनआयआयटी फाउंडेशन आणि ब्रिटिश पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुमित भुकनिया (झोनल हेड, एनआयआयटी फाउंडेशन ), सुप्रिया चव्हाण( रिजनल मॅनेजर, एनआयआयटी फाउंडेशन ), कर्नल फिरदोस धुवास कमांडिंग ऑफिसर एनसीसी, कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉ. विलास वाणी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये प्रदान करून त्यांना सक्षम बनविणे हा आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. नितीन घोरपडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्याधारित शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरी भागातील युवकांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत. युवक उद्योग निर्माण करू शकतो. असे सांगितले.
यावेळी कर्नल फिरदोस दुवास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले.
कार्यक्रमात एनआयआयटी फाउंडेशनचे प्रतिनिधी विकास कदम, प्राची घोलप आणि टीम तसेच ब्रिटिश पेट्रोलियम ( BP) चे अधिकारी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, उद्योगक्षेत्राशी निगडित प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगार मिळविणे अधिक सुलभ होईल.
या उपक्रमात ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. वैशाली शेरकर, प्रा. राजेश मोरे , प्रा.मनीषा गाडेकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment