अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय व विचार आणि अभिव्यक्ती कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिवाचन व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका डॉ. शोभा पाटील व डॉ. सुनंदा थोरात उपस्थित होत्या. ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी प्रास्ताविक केले.
लेखिका डॉ. शोभा पाटील यांनी कोविड नंतर साहित्यिक कार्यक्रम जवळ जवळ बंदच झाले आहेत. लोकांना साहित्य वाचायला, चर्चा करायला, एकत्र यायला आवडते. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात. असे सांगितले. या वेळी द. मा. मिरासदार लिखित ‘हुबेहूब’ या कथासंग्रहाचे अभिवाचन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. लतेश निकम, डॉ. नाना झगडे, डॉ. वंदना सोनवले, रामप्रकाश लद्दड, पवन कर्डक अक्षय कोकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नाना झगडे यांनी केले.



Comments
Post a Comment